जपून टाक पाऊल
माणसांना आपली अपत्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक वगैरे दृष्टीने आदर्शवत् व्हावीत, निरोगी राहावीत असे वाटते. सर्वच सजीवांची पिल्ले सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते गुण असले तर जास्त जगतात व जनतात. माणसे यात हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक काही करण्याचे प्रयत्नही करतात, हे माणसांचे वैशिष्ट्य. मुळात हे केवळ सजीव रचनांनी परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे एक अंग आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि अपेक्षित. यामुळेच …